जयंतीनिमित्त शिवरायांना त्रिवार मुजरा…; दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये शिवजयंती साजरी
Chhatrapati Shiavaji Maharaj Jayanti Program at Maharashtra Sadan Sambhajiraje Chhatrapati : देशाचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज जन्मदिवस... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राजधानी दिल्लीत कार्यक्रमांचं आयोजन, पाहा फोटो....
1 / 5
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, दिल्ली | 19 फेब्रुवारी 2024 : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती... त्यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजधानी दिल्लीतही उत्साह पाहायला मिळाला.
2 / 5
राजधानी दिल्लीतीला महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयजयकार पाहायला मिळाला. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी झाली.
3 / 5
राजधानी दिल्लीतील शेकडो शिवप्रेमी शिवजयंती उत्सवाला उपस्थित होते. दिल्लीतल्या शिवजयंतीमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला.
4 / 5
राजधानी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती संपन्न झाली. श्री शिवछत्रपती महाराजांचा ज्वाजल्य इतिहास, राष्ट्रभक्ती व त्यांचे विचार संपूर्ण देशभरात पोहोचावेत यासाठी सुरु केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान मिळाले, असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर खास फोटो शेअर केलेत.
5 / 5
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. लढून मिळविलेल्या राजसत्तेचा वापर लोककल्याणासाठी करत, "सार्वभौम स्वराज्य" स्थापन करणाऱ्या महान युगपुरुषास जयंती निमित्त त्रिवार मुजरा!, असं म्हणत संभाजीराजे यांनी शिवरायांना अभिवादन केलं आहे.