बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी; उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर

| Updated on: Nov 17, 2023 | 6:19 PM

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 11 व्या स्मृतीदिनानिमित्त आज राज्यासह देशभरात त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटात यावेळी प्रचंड धक्काबुक्की झाली. आज सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब येत बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले आहे.

1 / 5
आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 11 वा स्मृतीदिन. या दिवशी राज्यभरातून शेकडो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येतात. आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करतात.

2 / 5
ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहकुटूंब शिवाजी पार्कवर येऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवादही साधला.

3 / 5
 माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, अरविंद सावंत, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवाजी पार्कवर येऊन बाळासाहेबांना वंदन केलं.

4 / 5
 रश्मी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल रात्रीच स्मृतीस्थळावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री गेल्यानंतर या परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांना जोरदार धक्काबुक्की केली.

5 / 5
कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस सतर्क झाले होते. पोलिसांनी स्मृतीस्थळ परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. राज्य राखीव दलासह एकूण 300 पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले होते. या परिसरामध्ये 50 पेक्षा जास्त अधिकारी उपस्थित होते.