Manoj Jarange Patil : मुख्यमंत्र्यांनी 10 मिनिटं चर्चा केली अन् मनोज जरांगे यांनी 17 दिवसांचं उपोषण मागे घेतलं
CM Eknath Shinde Meets Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्या भेटीला; दहा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर 17 व्या दिवशी मनोज जरांगे यांनी आपलं अखेर उपोषण मागे घेतलं. पाहा फोटो...
1 / 5
मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. जालन्यात जिथं जरांगे पाटील मागच्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. तिथं जात मुख्यमंत्री त्यांना भेटले.
2 / 5
मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात 10 मिनिटे बातचित झाली. यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीत विशेषत: मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. मराठा आरक्षणातील अडचणी आणि उपाय यावर चर्चा झाली.
3 / 5
एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे आणि मराठा समाजाला आश्वस्त केलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पित जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. यावेळी अनेक स्थानिक लोक उपस्थित होते.
4 / 5
टिकणारं मराठा आरक्षणासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे. आपण आरक्षण मागे घ्या. सरकारला थोडा वेळ द्या आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना आश्वासन दिलं.
5 / 5
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आमच्यावर अन्याय होता कामा नये, असं म्हणत मराठा समाज आक्रमक झाला आहे.त्यामुळे येत्या महिनाभरात राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असेल.