स्थानिकांशी संवाद अन् शेतकऱ्याच्या बांधावर जेवण… रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेतील काही क्षण

| Updated on: Nov 21, 2023 | 1:06 PM

NCP MLA Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या युवा संघर्ष यात्रा करत आहेत. या पदयात्रेत ते लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांची ही यात्रा सध्या बीडमध्ये आहे. यावेळी स्थानिकांशी ते संवाद साधत आहेत. त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. युवकांशी त्यांच्या प्रश्नांवर बोलत आहेत. या पदयात्रेतील काही क्षण...

1 / 5
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या पद यात्रा करत आहेत. युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून ते ठिकठिकाणी भेटी देत आहेत.

2 / 5
युवा संघर्ष पदयात्रा सध्या बीडमध्ये आहे. तिथे कापूस उत्पादक शेतकरी कुटुंबाशी रोहित पवार यांनी संवाद साधला. त्यांच्यासोबत शेतात जेवण केलं.

3 / 5
कापूस वेचतानाचा फोटो रोहित पवार यांनी शेअर केलाय. मराठवाड्यात परिस्थिती खूप बिकट आहे. सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा, असं रोहित पवार म्हणाले.

4 / 5
बीड जिल्ह्यातील ईट गावातील सुशिक्षित बेरोजगार युवा महादेव जाधव यांच्या चहाच्या टपरीला रोहित पवार यांनी भेट दिली. तिथे चहा घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, असं रोहित पवार म्हणाले.

5 / 5
बीड शहरात युवा संघर्ष यात्रेत दिव्यांग भगिनीने आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या यात्रेला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला, असं म्हणत रोहित पवार यांनी हा फोटो शेअर केलाय.