आज 63 वा महाराष्ट्र दिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.
मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केलं.
यानंतर मुंबईतील हुतात्मा चौकात उपस्थित राहून महाराष्ट्राच्या स्थापनेकरता बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वंदन केलं.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा! संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मी अभिवादन करतो", असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं तेव्हा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते.