ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट पिछाडीवर; ठाकरेंची शिवसेना पाचव्या स्थानी

| Updated on: Nov 06, 2023 | 3:21 PM

Maharashtra Gram Panchayat Election 2023 Result : आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागतोय. या निकालात ठाकरे गट पिछाडीवर आहे. पहिल्या क्रमांकावर भाजप आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पाचव्या स्थानी आहे. या निकालातील महत्वाच्या बाबींवर नजर टाकूयात

1 / 5
आज राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. यातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता कुणाच्या बाजूने आहे, याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

2 / 5
2 हजार 359 जागांसाठी काल मतदान पार पडलं. त्यानंतर आज मतमोजणी होत आहे. 1 हजार 653 जागांचा निकाल सध्या समोर आला आहे.

3 / 5
ग्रामपंचायतींमध्ये 549 जागांवर भाजचा विजय झाला आहे. अजित पवार गटाचे उमेदवार 295 जागांवर निवडून आले आहेत.

4 / 5
एकनाथ शिंदे गटाला 214 जागांवर यश मिळालं आहे. काँग्रेस 122 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 102 जागांवर विजय मिळाला आहे.

5 / 5
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर झालेल्या या निवडणुकीत ठाकरे गट पिछाडीवर असल्याचं दिसतंय. या निकालांमध्ये ठाकरेंची शिवसेना पाचव्या स्थानावर आहे.