महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती जपणं महत्वाचं, राज्याच्या हितासाठी सर्व विरोधक एकाच मंचावर
इतर वेळेस जेव्हा संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर बरसणारे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांचं आज मात्र अनोख चित्र पाहायला मिळालं. संभाजीनगरमधील एका कार्यक्रमानिमित्ताने सर्वपक्षीय नेते मंचावर जमले होते.
1 / 5
महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर हा दिवसेंदिवस ढासळत चाललाय. सत्ताधारी-विरोधक विकास कामांपेक्षा वैयक्तिक हेवेदावे करण्यातच धन्यता मानताना दिसत आहे. महाराष्ट्राकडे देशाच्या राजकारणाला दिशा देणारं राजकारण म्हणू पाहिलं जायचं. मात्र हल्ली असं होताना दिसत नाही. मात्र आज (7 एप्रिल) रोजी सकारात्मक चित्र पाहायला मिळालं.
2 / 5
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आजपासून अवयवदान जनजागृती अभियानाला सुरुवात झाली. संभाजीनगरमध्ये या जनजागृती अभियानाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
3 / 5
या अभियानाला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमानिमित्ताने राज्यातील नेते एकाच मंचावर पाहायला मिळाले.
4 / 5
या कार्यक्रमाला खासदार भागवतराव कराड, खासदार इम्तियाज जलील, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भुमरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब आणि इतर नेते उपस्थित होते.
5 / 5
या कार्यक्रमादरम्यान इतर वेळेस एकमेकांवर राजकीय चिखळफेक करणारे नेते एकमेकांशी गप्पाटप्पा मारत होते. राज्यातील जनतेला या कार्यक्रमानिमित्ताने काही तास का होईना पण सकारात्मक चित्र पाहायला मिळालं.