10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. कालपासून सुरु झालेल्या मिरवणुका आजही सुरुच आहेत.
अश्यात मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर कचरा साचल्याचं पाहायला मिळतंय. सगळीकडे अस्वच्छता पाहायला मिळतेय.
हा कचरा स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतलाय. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी मोहिम राबवण्यात आली आहे.
अमित ठाकरे यांच्यासोबत नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, जय शृंगारपुरे, यशवंत किल्लेदार यांच्यासह अन्य पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
मुंबईमध्ये गिरगांव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येतेय. तर रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड या समुद्र किनाऱ्यांवर तर रत्नागिरीत मांडवीत मनसेच्या वतीने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
बाप्पाला निरोप देतोय. याचं दु:ख आहेच. पण समुद्र किनाऱ्यावर झालेला कचरा डोळ्यांना बघवत नाहीये. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतली, असं अमित ठाकरेंनी यावेळी सांगितलं.