आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्या निमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
विधानभवन परिसरात योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यापाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अबादास दानवे उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनी योगा केला.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरातील कार्यक्रमात योगा केला. त्याचे फोटो फडणवीसांनी शेअर केले आहेत.
गेट वे ऑफ इंडिया इथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगा केला. याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही गेट वे ऑफ इंडिया परिसरात योगा डे निमित्त योगा केला.