मुंबईत कालपासून पाऊस पडतोय. ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
मुंबईतील वरळीमधील कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
कोस्टल रोड इथं जात मुख्यमंत्री शिंदे यांनी पाणी साचण्याची कारणं जाणून घेतली. तसंच तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसात पाणी साचलं होतं. त्यामुळे याठिकाणी भेट देत मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती जाणून घेतली.
भविष्यात या परिसरात पाणी साचू नये, नागरिकांचे हाल होऊ नयेत. यासाठी उपाय योजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.