सध्या पावसाचे दिवस आहेत अन् अशा अल्हाददायक वातावरणात गरमागरम चहा घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टपरीवर चहा घेण्याचा मोह आवरलेला नाही.
देवेंद्र फडणवीस नागपुरात असताना त्यांनी एका टपरीवर जात चहाचा आनंद घेतला.
आता राज्याचे उपमुख्यमंत्री समोर असताना फोटो तो बनता है!, असं म्हणत तरूणाई फोटो काढण्यासाठी पुढे सरसावली.
देवेंद्र फडणवीस यांनी हे फोटो शेअर करताना, टपरीवरचा चहा नागपूरकरांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. चाय पे चर्चा!, असं म्हटलं आहे.