उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकमध्ये होते. प्रशिक्षणार्थी पोलीस दीक्षांत समारंभाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.
नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या 122 व्या दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.
शिस्त मोडणं आपल्याकडून घडणार नाही याची काळजी घ्यावी. पण शिस्तीत संवेदना हरवून चालणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
नाशिकमधल्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील कॉम्प्लेक्स, मोटार परिवहन विभाग इमारत, मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंतीचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे भूमीपूजन पार पडलं. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस नागपूरसाठी रवाना झाले.