लोकसभा निवडणुकीआधी भाजप नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये मोठा बदल
Amit Shah J P Nadda Nitin Gadkari Change Profile as Modi ka Pariwar : भाजप बड्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये मोठा बदल.... लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या नेत्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर मोठा बदल केला आहे. काय आहे हा बदल? वाचा सविस्तर...
1 / 5
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 04 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांनी नवीनवीन प्रचारतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.
2 / 5
यंदाची निवडणूक जिंकण्याचा विश्वास भाजप व्यक्त करत आहे. त्यामुळे भाजप या निवडणुकीची खास तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या बड्या नेत्यांच्या सोशल मीडियावर मोठा बदल करण्यात आहे.
3 / 5
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ट्विटर वरील प्रोफाइल बदलले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रोफाईलमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे 'मोदी का परिवार' असा उल्लेख करण्यात आला आहे.
4 / 5
भाजपच्या इतर बड्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हा बदल पाहायला मिळतोय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याही प्रोफाईलमध्ये हा बदल पाहायला मिळतोय.
5 / 5
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल यांनीही त्यांच्या प्रोफाइलमध्ये मोदी का परिवार असा उल्लेख केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा बदल पाहायला मिळतोय.