राहुल गांधी यांनी घेतला गवंडी कामाचा अनुभव; म्हणाले, हेच माझ्या जीवनाचं ध्येय…
Congress Leader Rahul Gandhi Masonry work : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील गौतम बुद्ध नगरला भेट दिली. यावेळी त्यांनी गवंडी कामाचा अनुभव घेतला. राहुल गांधी यांनी स्थानिकांशी संवाद साधला. कामगारांच्या अडचणी जाणून घेतल्या. वाचा सविस्तर बातमी...
1 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी विविध ठिकाणी भेटी देत असतात. विविध स्तरातील लोकांची राहुल गांधी भेट घेत असतात. आताही राहुल गांधी यांनी गवंडी काम करणाऱ्या कामगारांची भेट घेतली. दिल्लीतील गौतम बुद्ध नगर मधल्या कामगारांसोबत राहुल गांधी यांनी गवंडी कामाचा अनुभव घेतला.
2 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गवंडी कामाचा अनुभव घेतला. भारतात अनेक लोक हाताने काम करतात. त्यांचं हातावरचं पोट असतं. या काम करणाऱ्यांचा मी आदर करतो, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
3 / 5
इमारतीचं बांधकाम करणाऱ्या कामगारांसोबत राहुल गांधी यांनी संवाद साधला. कामगारांसोबत बांधकामाची माहिती घेत राहुल गांधी यांनी गवंडी काम केलं. याचे फोटो राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
4 / 5
हातावर पोट भरणाऱ्या कामागारांची आज भारतात काही किंमत नाही, हे मी आधीही हे बोललो आहे. आज या कामगारांशी बोलताना याची खात्री झाली, असं म्हणत राहुल गांधी यांनी हे फोटो शेअर केलेत.
5 / 5
भारतातील मजूर, हातावर पोट असणारे कामगार यांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा आहे. त्यांना त्यांचा सन्मान मिळवून द्यायचा आहे. हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.