पांढरा टी-शर्ट अन् हातात भाताची रोपं घेतलेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरियाणामधल्या सोनीपतमध्ये राहुल गांधी भाताच्या शेतात गेले. तिथे त्यांनी शेतकऱ्यांसोबत वेळ घालवला.
राहुल गांधी हे शेतकऱ्यांसोबत भाताची लावणी करताना दिसले.
राहुल गांधी हे ट्रॅक्टरही चालवताना यावेळी दिसले. जननायक म्हणत काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
सगळ्यांना एकजूट करायचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे, असं म्हणत काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.