“मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा धुंद तुझे सरकार”, नवी मुंबईत भाजपचे शंखनाद आंदोलन
भाजपकडून आज संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही भाजपकडून शंखनाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी "मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा धुंद तुझे सरकार" अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली.
नवी मुंबई भाजप शंखनाद आंदोलन
-
-
भाजपकडून आज संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही भाजपकडून शंखनाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी “मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा धुंद तुझे सरकार” अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली.
-
-
नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वात वाशी येथे इच्छापूर्ती गणपती मंदिरासमोर हे शंखनाद आंदोलन करण्यात आले.
-
-
यावेळी मंदिरे उघडण्यासाठी नवी मुंबई भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
-
-
तर राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी लवकरात लवकर मंदिरे उघडावीत अशी मागणी केली आहे.
-
-
तसेच नवी मुंबईत ठिकठिकाणी शंख आणि घंटी वाजवून गणपती मंदिरासमोर आरती करुन हे आंदोलन केले. राज्य सरकारने मंदिराऐवजी बार उघडे केल्याने “जनतेचे हाल तर ठाकरे सरकार मालामाल” अशी घोषणाबाजी करण्यात आली.