Photo : कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 9 मंत्र्यांचे जल्लोषात स्वागत, पहा फोटो
कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सर्व मंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजर होते.
1 / 9
भाजपा,शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारमधील अमळनेरचे भूमिपुत्र तथा राज्याचे नूतन मंत्री ना. अनिल पाटील यांचा बाजार समितीच्या आवारात आज छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
2 / 9
आंबेगाव-शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात दिलीप वळसे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
3 / 9
नाशिक ते पुणे प्रवासादरम्यान सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. तसेच महिला भगिनींनी औक्षणही केले.
4 / 9
कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अदिती तटकरे यांचेही महिला कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
5 / 9
कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
6 / 9
कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
7 / 9
कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धर्मराव बाबा आत्राम यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
8 / 9
बीडच्या पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाटा येथे धनंजय मुंडे यांचे जल्लोषात स्वागत झाले. क्रेनच्या साह्याने तीस फुटाचा हार घालून धनंजय मुंडे यांचे स्वागत करण्यात आले.
9 / 9
शपथविधीनंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचे लातूरमध्ये ठिकठिकणी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आले.