Parliament Members Visit Baramati : जेव्हा देशभरातील खासदार बारामतीला भेट देतात…
देशभरातील खासदार बारामतीत आले. त्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. महाराष्ट्रात आणि विशेष करून बारामतीत कशी शेती केली जाते, याविषयी त्यांनी माहिती करून घेतली.
1 / 5
शरद पवार यांचं शेतीवर विशेष प्रेम आहे. याच प्रेमतून त्यांनी बारामतीत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची निर्मिती केली आहे. पारंपारिक शेतीसह आधुनिक शेतीचं इथे मॉडेल उभं करण्यात आलं आहे. हे बारामती मॉडेल बघण्यासाठी देशभरातील खासदार बारामतीत आले होते.
2 / 5
एरव्ही संसदेत हिरिरीनं आपल्या भागातील प्रश्नांना वाचा फोडणारे खासदार बारामतीत आले. त्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. महाराष्ट्रात आणि विशेष करून बारामतीत कशी शेती केली जाते, याविषयी त्यांनी माहिती करून घेतली.
3 / 5
रितेश पांडे, विवेक गुप्ता, सीएम रमेश, खासदार शिवकुमार यांच्यासह अन्य खासदार बारामती दौऱ्यावर होते. त्यांनी बारामतीतील विविध भागांना भेटी दिल्या.
4 / 5
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार,अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांच्यासह अन्य मंडळींनी या खासदारांना बारामतीची सफर घडवली.
5 / 5
"देशभरातील खासदारांनी बारामतीला भेट दिली. इथली शेती कशी चालते, कोणती पिकं घेतली जातात. त्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो.अश्या बऱ्याच गोष्टी या संसद सदस्यांनी जाणून घेतल्या. तसंच इथले उद्योग कसे आहेत हेही जाणून घेतलं. शिवाय बारामतीतील इतर भागानांही त्यांनी भेट दिली. याचा मला आनंद आहे", असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.