पांढरी शॉल, भगवा गमछा अन् माथ्यावर टिळा… तिरूपती बालाजीच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक
PM Narendra Modi at Tirumala Balaji Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्रप्रदेश दौऱ्यावर आहेत. तिथे तिरुमला इथं जात बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी ते पारंपरिक वेशात दिसले. यावेळी बालाजीच्या चरणी त्यांनी काय साकडं घातलं? याबाबत ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली आहे. पाहा...
1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेंकटेश्वर मंदिरात गेले. दर्शन घेतलं. तिथे त्यांनी विधिवत पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर हे फोटो शेअर केले आहेत.
2 / 5
बालाजीला गेल्यानंतर नरेंद्र मोदी हे पारंपरिक वेशभूषेत दिसले. पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये नरेंद्र मोदी यावेळी दिसले. या कपड्याची किनार ही नारंगी, पांढरा आणि हिरव्या रंगाची आहे. तर भगव्या रंगाचा गमछा त्यांनी परिधान केला होता. तसंच डोक्याला टिळा लावला होता.
3 / 5
बालाजीचं दर्शन घेतलं. यावेळी देशवासीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. 140 कोटी भारतीयांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, कल्याणासाठी बालाजीकडे साकडं घातलं. तसंच देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली, असं मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
4 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरूमलामध्ये आहेत. काल संध्याकाळी साडे सात वाजता पंतप्रधान मोदी हे रेनिगुंटा विमानतळावर उतरले. यावेळी आंध्रप्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विमानतळावर जात मोदांचं स्वागत केलं. त्यानंतर आज मंदिरात जात बालाजीचं दर्शन घेतलं.
5 / 5
बालाजी मंदिरातील पुजाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी यांनी पूजा केली. त्यानंतर महबूबाबादच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. यानंतर तेलंगणाच्या करीमनगरमध्ये त्यांची एक सभा होणार आहे.