PM Salary : भारताचे सर्वात ताकदवान पद असलेल्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांना पगार तरी किती मिळतो ?, अन्य सुविधा कोणत्या ?
नरेंद्र मोदी आज रविवारी ( 9 जून 2024 ) सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक कॅबिनेट मंत्री देखील शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताच्या सर्वोच्च पदासाठी किती वेतन आणि सोयी सुविध असतात ? राष्ट्रपती आणि खासदारांना काय सुविधा आणि वेतन असते ते पाहूयात
1 / 11
भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेत पंतप्रधान हे सर्वात महत्वाचे आणि ताकदवान पद आहे. देशाच्या आणि सर्व राज्यांच्या विकासासाठी पंतप्रधान निर्णय घेत असतात. नरेंद्र मोदी हे आज रविवारी ( 9 जून 2024 ) सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत कॅबिनचे मंत्री देखील पद आणि गोपनियतेची शपथ घेतील.
2 / 11
अनेकांना पंतप्रधान पदाचे महत्व आणि काम माहिती असते, परंतु पंतप्रधान पदाला मिळणारे वेतन आणि सुविधा याबाबत बुहतेकांना माहीती नसते. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांना मिळणारे वेतन, भत्ते आणि इतर सुविधांबद्दल माहीती जाणून घ्या
3 / 11
पंतप्रधान पदाचे पगार आणि इतर सुविधा पाहुयात. भारतात पंतप्रधानांचे मासिक वेतन 1.66 लाख रुपये आहे. यामध्ये मूळ वेतन 50,000 रुपये, खर्च भत्ता 3,000 रुपये, संसदीय भत्ता 45,000 रुपये आणि 2,000 रुपये दैनिक भत्ता यांचा समावेश आहे.
4 / 11
पंतप्रधानांना अधिकृत सरकारी निवासस्थान, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षा, सरकारी वाहने आणि विमानांची सुविधा, आंतरराष्ट्रीय सहलींसाठी सरकारकडून भाडे, निवास आणि जेवणाचा खर्च देखील मिळतो.
5 / 11
पंतप्रधानांना निवृत्तीनंतरही अनेक सुविधा मिळतात. या सुविधांपैकी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माजी पंतप्रधानांना पाच वर्षांसाठी मोफत सरकारी घर, वीज, पाणी आणि एसपीजीची सुविधाही मिळते.
6 / 11
राष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते देखील जाणून घेऊयात. भारताचे राष्ट्रपती तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असतात. लोकशाहीत ही एक अतिशय महत्वाची पोस्ट आहे. भारतात राष्ट्रपतींना दरमहा 5 लाख रुपये वेतन मिळते.
7 / 11
राष्ट्रपतींना अनेक करमुक्त भत्ते देखील मिळतात, ज्यात जगभरातील ट्रेन आणि विमानाने मोफत प्रवास, मोफत घर, वैद्यकीय सेवा आणि कार्यालयीन खर्चासाठी वार्षिक 1 लाख रुपये समाविष्ट आहेत.
8 / 11
माजी राष्ट्रपतींना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन, सरकारी घर, दोन मोफत लँडलाइन फोन, एक मोबाइल फोन आणि पाच वैयक्तिक कर्मचारी आदी सुविधाही मिळते.
9 / 11
भारतातील एका खासदाराला दरमहा एक लाख रुपये वेतन मिळते. याशिवाय दैनंदिन भत्ताही मिळतो, जो दर पाच वर्षांनी वाढतो. खासदाराला संसदेची अधिवेशने, समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी दररोज 2,000 रुपये आणि कार प्रवासासाठी प्रति किलोमीटर 16 रुपये प्रवास भत्ता मिळतो.
10 / 11
खासदारांना दरमहा 45,000 रुपये मतदारसंघ भत्ता आणि 45,000 रुपये कार्यालयीन खर्च भत्ता देखील मिळतो, ज्यामध्ये स्टेशनरी आणि टपालासाठी 15,000 रुपये समाविष्ट आहेत.
11 / 11
पगाराव्यतिरिक्त, खासदाराला कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सुविधा, सरकारी निवास, स्वतःसाठी आणि जवळच्या नातेवाईकांसाठी दरवर्षी 34 वेळा मोफत देशांतर्गत विमान प्रवासाची सोय असते. त्यांना फर्स्ट क्लास ट्रेन प्रवासाची मोफत सुविधाही मिळते.