PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या छतावरील राष्ट्रीय बोधचिन्हाचे अनावरण संपन्न
पंतप्रधानांच्या हस्ते तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कांस्य पासून बनवण्यात आले आहे. त्याचे एकूण वजन 9500 किलो आहे. आणि त्याची उंची 6.5 मीटर आहे. हे नवीन संसद भवनाच्या सेंट्रल फोयरच्या शीर्षस्थानीठेवण्यात आले आहे.
1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवीन संसद भवनाच्या छतावरील राष्ट्रीय बोधचिन्हाचे अनावरण केले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.
2 / 6
पंतप्रधानांच्या हस्ते तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कांस्य पासून बनवण्यात आले आहे. व त्याचे एकूण वजन 9500 किलो आहे. आणि त्याची उंची 6.5 मीटर आहे.
3 / 6
या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या कामात सहभागी असलेल्या श्रमजीवींशीही संवाद साधला.
4 / 6
हे नवीन संसद भवनाच्या सेंट्रल फोयरच्या शीर्षस्थानीठेवण्यात आले आहे. प्रतीकाला आधार देण्यासाठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलची आधारभूत रचना तयार करण्यात आली आहे.
5 / 6
नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय चिन्हाच्या कास्टिंगची संकल्पना रेखाटन आणि प्रक्रिया क्ले मॉडेलिंग/कॉम्प्युटर ग्राफिकपासून कांस्य कास्टिंग आणि पॉलिशिंगपर्यंतच्या आठ वेगवेगळ्या टप्प्यांतून गेली आहे.
6 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये या नवीन संसद भवनाच्या वास्तूची पायाभरणी केली होती. त्यानंतर आज या कार्यक्रमाच्या उदघाट्नप्रसंगी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, शहर विकास मंत्री हरदीपसिंग पुरीही उपस्थित होते .