कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारकडून 40 % कर; शेतकरी आक्रमक, अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आळेफाट्यावर रास्ता रोको

| Updated on: Aug 22, 2023 | 12:36 PM

Alefata Farmer Ptotest on Onion Export Tax Decision : केंद्र सरकारचा कांद्याच्या निर्यातीवरील निर्णय शेतकऱ्याच्या ताटात मात कालवणारा; अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आळेफाट्यावर रास्ता रोको आंदोलन, पाहा फोटो...

1 / 5
केंद्र सरकारने कांद्या निर्यातीवर 40 % कर लावला आहे. त्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

2 / 5
केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहे. पुण्यातील आळेफाट्यावरही आज शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन करत आहेत.

3 / 5
शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. या आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

4 / 5
पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरीही या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. यावेळी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

5 / 5
अमोल कोल्हे यांनी यावेळी आक्रमक झाले. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणारा आहे. सरकारने पुन्हा एकदा या निर्णयाचा विचार करावा, असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.