काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या दिल्लीत आहे.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी हज़रत निज़ामुद्दीन औलिया दर्गाहमध्ये गेले. यावेळी राहुल गांधी यांच्या डोक्याला रुमाल बांधलेला होता.
राहुल गांधी यांनी हज़रत निज़ामुद्दीन औलिया दर्गाहमध्ये जाऊन दर्शन घेत चादर चढवली.
राहुल गांधी यांनी दर्गाहमध्ये गेल्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध धार्मिकस्थळांना भेट देत आहेत. याआधी त्यांनी गुरुद्वारालाही भेट दिली होती.