भाजपा प्रदेश सोशल मिडिया पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधण्यात आली.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही रक्षाबंधन साजरं केलं. याचा फोटो अंबादास दानवे यांनी शेअर केलाय.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना राखी बांधली. भावा बहिणीच्या नात्यातील हा हळवे क्षण चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बीजमाता पद्मश्री राहिताई पोपेरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना धान्याची राखी पाठवली आहे. यावेळी तुमचा वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असा शब्द चंद्रकांत पाटलांनी दिला.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून एक धागा मायेचा हा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला.