अजित पवार यांनी काल भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षातील ही फूट रोखण्यासाठी शरद पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत.
शरद पवार यांनी कराडमधील प्रीतीसंगमावर जात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे.
शरद पवार प्रीतीसंगमावर गेले तेव्हा राष्ट्रवादी नेते-कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते. शेकडोंच्या संख्येने पवार समर्थक तिथे उपस्थित होते.
शशिकांत शिंदे, रोहित पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हेदेखील प्रीतीसंगमावर उपस्थित होते.
प्रीती संगमावरून शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.