सातव्या टप्प्यातील मतदान उत्तर प्रदेशात पार पडतंय. यावेळी महिलांची रांग मतदानासाठी लागली असल्याचं पाहायला मिळालं.
उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये महिलांनी मतदानासाठी रांग लावली होती.
विशेष म्हणजे वाराणसीमध्ये महिलांसाठी मतदान करायला पिंक बुथ उभारण्यात आले आहेत.
वोटिंग कार्ड घेऊन महिलांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावलाय.
उत्तर प्रदेशात सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय. यानंतर 10 मार्चला उत्तर प्रदेशसह गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.