पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. पूजा चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती देखील चाहत्यांना देते.
पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.
उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना सुद्धा प्रचंड आवडतात.
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पाऊल ठेवलं होतं. आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, निळकंठ मास्तर अशा हिट चित्रपटांमध्ये पूजाने अभिनय केला आहे.
पूजाने 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारली आहे.