Marathi News Photo gallery Pradhanmantri Sangrahalaya PM Narendra Modi inaugurates the Prime Minister's Museum in New Delhi tin Murti Bhavan
Pradhanmantri Sangrahalaya : ‘भावी पिढीसाठी हे संग्रहालय विचाराचं दालन ठरेल’, नरेंद्र मोदींना विश्वास; पंतप्रधान संग्रहालयाचं लोकार्पण
आतापर्यंतच्या भारतीय पंतप्रधानांबाबत माहिती देणारं, नव्या पिढीला त्यांची नव्यानं ओळख करुन देणारं, तरुणांसाठी दिशादर्शक ठरेल असं पंतप्रधान संग्रहालय राजधानी दिल्लीतील तीन मूर्ती भवन परिसरात उभारण्यात आलं आहे. या पंतप्रधान संग्रहालयाचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.
1 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील तीन मूर्ती भवन परिसरात पंतप्रधान संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. उद्धाटनानंतर पंतप्रधानांनी संपूर्ण संग्रहालयातील आजवरच्या पंतप्रधानांबाबत देण्यात आलेली माहिती जाणून घेतली.
2 / 10
पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांशी संवाद साधला. पंतप्रधान संग्रहालयाचं देशाला लोकार्पण करणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. त्यावेळी हे संग्रहालय आपल्याला प्रेरणा देईल, असं मोदी यावेळी म्हणाले.
3 / 10
या संग्रहालयात देशाचं भविष्य देखील दडलेलं आहे. इथं गेल्या काही वर्षातील आपल्या देशाची वाटचाल पाहताना भविष्याचं स्वप्न पाहता येईल. भारताच्या बदलत्या विकासाचं चित्र जगाला पाहायला मिळेल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला त्या काळात गेल्या सारखं वाटेल, असंही मोदी म्हणाले.
4 / 10
देशाच्या वाटचालीतील गेल्या 75 वर्षात अनेक अभिमानाचे प्रसंग देशानं अनुभवले आहेत. त्या महत्त्वाच्या घटना आणि प्रसंग आपल्याला संग्रहालयात पाहायला मिळतील. मी यानिमित्तानं सर्व देशवासीयांना शुभेच्छा देत असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
5 / 10
पंतप्रधान संग्राहलयात आजपर्यंतच्या 14 पंतप्रधानांचे दुर्मिळ फोटो, त्यांची भाषणं, मूळ लेखनासह त्यांच्या अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
6 / 10
संग्रालयाच्या डिझाईनमध्ये शाश्वत आणि ऊर्जा संवर्धन पद्धतीचा समावेश करण्यात आलाय. या इमारतीच्या उभारणीवेळी एकही झाड तोडण्यात आलं नाही. इमारतीचं क्षेत्रफळ एकूण 10 हजार 491 चौरस मीटर आहे.
7 / 10
इमारतीचा लोगो हा राष्ट्र आणि लोकशाहीचं प्रतिक असलेल्या अशोक चक्र धारण केलेल्या भारतातील लोकांच्या हातांचं प्रतिनिधित्व करतो.
8 / 10
पुनर्विकसित ब्लॉग 1 मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळालेल्या अनेक भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. ज्या अद्याप नेहरू संग्रालयाचा भाग नव्हत्या.
9 / 10
माजी पंतप्रधानांची माहिती दूरदर्शन, चित्रपट विभाग, संसद टीव्ही, संरक्षण मंत्रालय, मीडिया हाऊसेस, प्रिंट मीडिया, परदेशी वृत्तसंस्था, MEA चा तोशाखाना अशा अनेक संस्थांकडून संकलित करण्यात आलाय. तसंच माजी पंतप्रधानांच्या कुटुंबाकडूनही महत्वाची माहिती आणि विविध वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत.
10 / 10
इमारतीमध्ये होलोग्राम, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, मल्टी मीडिया, स्मार्टफोन अॅप्लिकेशन्स आदी तांत्रिक गोष्टींचा पुरेपुर वापर करण्यात आलाय.