मराठीतली सुंदर अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेचं नाव आघाडीवर आहे. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
सतत नवनवीन फोटोशूट शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते. नेहमी भटकंती करत ती नवनवीन जागेचं सौंदर्य सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांनासुद्धा दाखवते. आता तर तिनं स्वत:चं चॅनलही सुरू केलंय.
‘जे मानवतेबद्दल आपल्याला सर्वात जास्त शिकवतात ते नेहमीच माणसे नसतात’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
अगदी प्रेमळ अंदाजात गाईच्या वासरासोबत हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नेहमीच ग्लॅमरस अंदाजात दिसणारी प्रार्थना या रुपात चाहत्यांचं मन जिंकत आहेत.