PHOTO | कोरोनानंतर हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी काय करावं?
कोरोना हा एक फुफ्फुसाचा आजार असल्याचा विचार आपण करता, कारण अनेकांना धाप लागणे किंवा श्वास घेताना त्रास होत आहे. परंतु, संशोधनाचा वाढता अभ्यास असे दर्शवतो की कोरोना हृदयावरही आक्रमण करू शकतो.
1 / 9
कोरोना हा एक फुफ्फुसाचा आजार असल्याचा विचार आपण करता, कारण अनेकांना धाप लागणे किंवा श्वास घेताना त्रास होत आहे. परंतु, संशोधनाचा वाढता अभ्यास असे दर्शवतो की कोरोना हृदयावरही आक्रमण करू शकतो. नुकतेच लोकप्रिय टीव्ही अँकर रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
2 / 9
संशोधकांच्या अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की, कोरोनातून बरे झालेल्या बर्याच जणांचे हृदयाला देखील हानी पोहचलेली असते, विषाणूच्या हल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील निर्माण होतो. काहीना ही लक्षणे सौम्य वाटतात, त्यामुळे असे लोक रुग्णालयात जाणे टाळतात.
3 / 9
घरच्या घरी करा या टेस्ट, 90 सेकंदात कळेल तुमचे हृदय हेल्दी आहे की नाही
4 / 9
इतर संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोनामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते किंवा काही लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
5 / 9
जे लोक 65 किंवा त्याहून अधिक वयाचे किंवा दीर्घकालीन आजारांनी पिडीत आहेत, त्यांना कोरोना संसर्गामुळे हृदयाच्या गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असू शकतो, परंतु त्यापेक्षा कमी वयाने निरोगी लोकही यामुळे बाधित होऊ शकतात.
6 / 9
हॅकेनसॅक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर येथील हार्ट अँड वॅस्क्युलर हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डेव्हिड लॅन्डर्स म्हणतात,“कोरोना झालेल्या सर्व रूग्णांच्या हृदय तपासणीसाठी काही शिफारसी करण्यापूर्वी आणखी संशोधन करणे आवश्यक आहे.” जर तुम्हाला छातीत दुखणे, श्वास लागणे, हृदयाची धडधड होणे किंवा सुजलेल्या घोट्या यासारखी चिंताजनक लक्षणे दिसली, तर त्वरित आपल्या डॉक्टरांना कॉल करा.
7 / 9
कोरोना काळात इमर्जन्सी वॉर्डमध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात येण्याच्या भीतीने काही लोक आपातकालीन वेळेतही रूग्णालयात जाणे टाळतात. जर आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसत असतील, तर त्वरीत रूग्णालयात जाणे आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
8 / 9
Heart
9 / 9
डॉ. लॅन्डर्स म्हणतात, “जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तुम्ही कोरोनामधून बरे झाला असाल तर, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी इएमटी आणि इमर्जन्सी रूममधील डॉक्टरांना हा तपशील सांगावा.”