‘मी माधुरीला ठेल्यावर टॉर्चर केलं!’, अभिनेत्याने सांगितला विनयभंगाच्या सीनचा किस्सा

| Updated on: Mar 21, 2025 | 12:00 PM

Molestation Scene with Madhuri Dixit : एका खलनायकाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षितसोबत शूट केलेल्या सीन विषयी सांगितले आहे. हा सीन शूट करत असताना माधुरी अचानक रडू लागल्याचे देखील त्याने सांगितले.

1 / 5
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. माधुरीने डान्स आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एक काळ असा होता की माधुरीसोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक होते. दरम्यान, एका चित्रपटातील खलनायकाने माधुरीसोबत शूट केलेल्या सीनविषयी सांगितले आहे.

2 / 5
माधुरी आणि रंजीत यांनी 'प्रेम प्रतिज्ञा' या चित्रपटात एकत्र काम केले होके. या चित्रपटात त्यांनी मोलेस्टेशन आणि रेप सीन शूट केला होता. हा सीन शूट करत असताना माधुरी अक्षरश: ठसाठसा रडली होती.

3 / 5
रंजीत यांनी नुकताच 'विकी लालवानी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "चित्रपटाचे नाव 'प्रेम प्रतिज्ञा' होते. माधुरी तेव्हा अगदी नवीन अभिनेत्री होती. माझी प्रतिमा ही एका क्रृर आणि हत्या करणाऱ्या घाणेरड्या खलनायकाची अशी तेव्हा होती. मुले-मुली मला बघून अक्षरश: घाबरायचे. माधुरीने माझ्या विषयी बरेच काही ऐकले होते आणि ती ते ऐकून घाबरली होती. आम्हाला सोबत एक विनयभंगाचा सीन शूट करायचा होता.'

4 / 5
पुढे रंजीत म्हणाले की, "या चित्रपटासाठी वीरू देवगण हे फाइट मास्टर होते. सीन असा होता की मला एक ठेल्याजवळ माधुरीची छेड काढायची होती. मला माझ्या दुसऱ्या सिनेमाच्या देखील शूटिंगसाठी जायचे होते. त्यामुळे मी घाईत होतो आणि सेटवर तिची परिस्थिती काय आहे त्याविषयी मला काहीच कल्पना नव्हती. माधुरी विषयी मला खूप वेळानंतर कळालं. ती रडत होती. मी तिच्याकडे गेलो आणि तिचे सांत्वन केले. मी तिला समजावले की मी एक चांगला माणूस आहे."

5 / 5
'कसाबसा सीन शूट केला. सीन चांगल्या पद्धतीने शूट झाला. माधुरी सीननंतरही रडली. सगळे तिच्याकडे धावत गेले आणि तिला ठिक आहेस का असे विचारत होते. माधुरीने सांगितले की 'मला कोणत्या गोष्टीची जाणीव झाली नाही. त्यांनी मला स्पर्श देखील केला नाही. मी माधुरीला स्पर्श ही नकरता तो सीन शूट केला होता. फक्त ठेल्यावर झोपून इकडे तिकडे फिरत टॉर्चर केले होते' असे रंजीत म्हणाले.