PM Modi : पहिल्या लता मंगेशकर पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित
ईश्वराचा उच्चारही स्वराविना होत नाही. संगीत मनात खोलवर रुजते. लतादिदी युवा पिढीसाठी एक प्रेरणा आहेत. त्यांनी भारताला स्वातंत्र्याआधीपासून आवाज दिला. मंगेशकर परिवाराचे देशासाठी मोठे योगदान राहिले आहे.
1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आले आहेत.
2 / 6
यापेक्षा जीवनाचं सार्थक काय असेल.जेव्हा रक्षा बंधन येईल तेव्हा दीदी नसेल. मी पुरस्कार घेत नाही. पण बहीणीच्या नावाने पुरस्कार मिळतो त्यामुळे मी आलो.मंगेशकर कुटुंबावर माझ्यावर हक्क आहे.आदिनाथचा मेसेज आला. तेव्हा मी किती बीझी आहे हे पाहिलं नाही. म्हटलं होकार द्या.मला नकार देणं शक्य नाही. मी हा पुरस्कार जनतेला अर्पित करतो.लतादीदी जनतेच्या दीदी होत्या. त्यामुळे हा पुरस्कारही जनतेला अर्पित करतो. अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.
3 / 6
संगीत राष्ट्रभक्ती आणि कर्तव्य बोधाच्या शिखरावर पोहोचवतो. संगीताच्या या सामर्थ्याला आपण लता मंगेशकरांच्या रुपामुळे साक्षात पाहिलं आहे. त्यांचं दर्शन करण्याचा अनुभव मिळाला आहे. मंगेशकर कुटुंबाने पिढी दर पिढी या यज्ञात आहुती दिली आहे असेही पंतप्रधान म्हणाले
4 / 6
या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मंगेशकर कुटुंबियांनी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मात्र या पुरस्कार सोहळयाला मुख्यमंत्री गैरहजर असल्याचे दिसून आले. कार्यक्रमपत्रिकेत नवा नसल्याचे मुख्यमंत्री गैहजर असल्याचे बोलले जात आहे.
5 / 6
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी सभागृहात राजकीय नेते. मोठ्या संख्येनं नागरिक, लतादिदीचे चाहते उपस्थित होते.
6 / 6
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंंह कोश्यारीही, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते