PHOTO | पंतप्रधान नरेंद्र मोदींची सकाळी अचानक दिल्लीतील गुरुद्वाराला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अचानक दिल्लीतील गुरुद्वारा रकाबगंज इथं भेट दिली. यावेळी त्यांनी गुरु तेग बहाद्दुर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अचानक दिल्लीमधील गुरुद्वाराला भेट दिली.
-
-
पंतप्रधान मोदी यांनी सकाळी गुरुद्वारा रकाबगंज इथं जात माथा टेकला आणि गुरु तेग बहाद्दुर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
-
-
मोदी यांचा गुरुद्वाराचा दौरा अचानक ठरला. त्यावेळी रस्त्यावरील ट्राफिकही अडवण्यात आली नव्हती.
-
-
महत्वाची बाब म्हणजे मोदी यांच्यासाठी रोजप्रमाणेच सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. यावेळी कोणता खास पोलिस बंदोबस्तही करण्यात आला नव्हता.
-
-
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन गुरु तेग बहाद्दुर यांना श्रद्धांजली अर्पण केल्याची माहिती दिली.
-
-
यावेळी नरेंद्र मोदी यांनी गुरुद्वारात उपस्थित लोकांना सेल्फीही काढू दिला.
-
-
दिल्लीच्या सीमेवर गेल्या 24 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्यात प्रामुख्याने शिख समाजातील शेतकरी आहे.
-
-
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज गुरुद्वाराला भेट दिल्याची चर्चा विरोधी पक्षांमध्ये सुरु झाली आहे.