चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिनं अद्याप फिल्मी जगात पाऊल ठेवलं नसलं तरी सोशल मीडियावर तिला प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. स्वत:चे छान आणि ग्लॅमरस फोटो ती इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.
यावेळी खुशीचे इन्स्टाग्रामवर 433 हजार फॉलोअर्स आहेत. ही स्टार किड आपल्या स्टाईल स्टेटमेंटद्वारे तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते.
नुकतंच तिनं स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन दिसली.
या फोटोत तिनं केस खुले ठेवले आहेत आणि न्यूड मेकअप केला आहे. खुशीने यासह कोणत्याही प्रकारची ज्वेलरी कॅरी केलेली नाही.
खुशीनं फोटो शेअर करत एक गोंडस कॅप्शनही लिहिलं आहे. ‘मी माझ्या बेडरूमची राजकन्या आहे.’ हे कॅप्शन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.