अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत या दोघांची जोडी रिल आणि रिअल लाइफमध्ये नेहमी चर्चेत असते.आता उमेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यानं ‘काय म्हणते आहे ही? Get ready for पाडवा की ...?’ असं कॅप्शन दिलं आहे.
'..आणि काय हवं ' या वेब सिरिजमधून प्रिया आणि उमेश यांची जोडी प्रेक्षकांच्या अजूनच पसंतीस उतरली. आता लवकरच '..आणि काय हवं 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हे परफेक्ट कपल नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतं. एकमेकांसोबतचे फोटो हे दोघंही शेअर करत असतात. नुकतंच दोघंही कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत.
हे लाडकं कपल सध्या नवनवीन फोटोशूट करत सोशल मीडियावर शेअर करतंय.
या फोटोमध्ये दोघंही प्रचंड सुंदर दिसत आहेत. तसंच हे फोटो त्यांच्या चाहत्यांच्यासुद्धा पसंतीस उतरच आहेत.