आज कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या त्यांचा 73वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त प्रियंका गांधी यांनी फेसबुक अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सोनिया गांधी आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही आनंदेचे क्षण लुटताना दिसत आहेत.
सोनिया गांधी यांचं मूळ नाव ॲन्टोनीया माईनो असून त्यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 ला इटलीमध्ये झाला होता. आता सध्या त्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा आहेत. त्यांनी जवळजवळ दोन दशक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.
सोनिया गांधी यांनी राजकारणात पदार्पण केल्यानंतर त्या परदेशातून आल्या असल्यानं अनेक वाद विवाद झाले. मात्र भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
सोनिया गांधी यांनी भारताचे पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्यासोबत विवाह केला होता. या दोघांची लव्ह स्टोरी खूप रंजक आहे. राजीव गांधी शिक्षणासाठी लंडनमध्ये असताना आपल्या मित्रांसोबत फिरायला जायचे. 1956 मध्ये राजीव गांधी एका हॉटेलमध्ये गेले असता त्यांना सोनिया गांधी दिसल्या आणि ते प्रेमात पडले.
सोनिया गांधीसुद्धा राजीव गांधींच्या प्रेमात पडल्या होत्या. त्या एका सर्वसाधारण घरातून होत्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्या एका हॉटेलमध्ये काम करत होत्या.