अभिनय आणि गाण्यांद्वारे सर्वांची मनं जिंकल्यानंतर आता प्रियंका चोप्रानं तिचा अनोमली नावाचा हेअर ब्रँड लाँच केला आहे.
प्रियंकानं स्वत: ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. एवढंच नाही तर तिनं काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
आपल्या प्रोडक्टविषयी माहिती देताना प्रियंकानं कॅप्शन दिलंय, ‘हे अनोमली आहे. मी तयार केलेला माझा पहिला ब्रँड, मी 18 महिन्यांपासून या प्रोडक्टवर आणि ब्रँडवर काम करत आहे.’
प्रियंका चोप्राच्या या ब्रँडची उत्पादनं 31 जानेवारीला अमेरिकेत लाँच होणार आहेत आणि या वर्षातच जागतिक बाजारपेठेत हे प्रोडक्ट्स उपलब्ध होतील.