पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज उद्घाटन होत आहे. त्यामुळे पुणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.
चांदणी चौक सध्या कसा दिसतोय? त्याचा ड्रोनच्या माध्यमातून घेतलेला आढावा...
दहा महिन्यांच्या काळात हा उड्डाणपूल तयार करण्यात आला. तर यासाठी 865 कोटी रुपयांचा खर्च आला.
पुढच्या 50 वर्षांचा विचार करुन हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. दर दिवशी दीड लाख वाहनं या उड्डाणापुलावरून जाऊ शकतात.
मुंबईवरुन साताऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन होते आता तीन लेन तयार करण्यात आले आहेत. साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वी दोन लेन आता तीन लेन करण्यात आलेत. मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे.