याद्वारे पीएनबी ग्राहक कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किंवा मर्चंट वेबसाईटवर पीएनबी ई-कार्ड वापरु शकतो. त्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कार्ड बाळगण्याची गरज नाही.
पीएनबीने दिलेल्या माहितीनुसार, पीएनबी ग्राहक PNB Genie Mobile app मध्ये e-Card सुविधेचा वापर करत पीएनबी ई-कार्ड संदर्भात माहिती मिळवू शकतात. हे कार्ड वापरण्यासाठी पीएनबीच्या ग्राहकांना त्यांचे PNB Genie अॅप अपडेट करणे आवश्यक आहे.
punjab national bank
PNB ई-कार्ड हे विनामूल्य उपलब्ध आहे. तसेच हे वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण हे तुम्हाला इतर क्रेडीट आणि डेबिट कार्डसारखी दाखवावे लागत नाही. त्याशिवाय याची माहिती कोणत्याही दुकानदार, पेट्रोल पंप किंवा इतरांना दिली जात नाही. हे कार्ड 48 तासांसाठी किंवा व्यवहाराच्या समाप्तीपर्यंत वैध राहते. यानंतर ते बंद होते. ऑनलाईन व्यवहारासाठी हे कार्ड केवळ ओटीपीद्वारे वैध असते. हा ओटीपी ग्राहकांच्या फोनवर येतो. त्यामुळे फसवणूक करणारे तुमच्या खात्यास हानी पोहोचवू शकत नाहीत.
हे कार्ड आपल्या इंटरनेट बँकिंग लिंक केलेल्या खात्यांसोबत सुलभ व्यवहार करते. हे कार्ड डेबिट / क्रेडिट कार्ड स्वीकारणार्या कोणत्याही ऑनलाईन व्यवहारावेळी वापरले जाऊ शकतात. त्यासाठी कोणतेही स्वतंत्र सेटअप / इन्स्टॉलेशन किंवा नोंदणी आवश्यक नाही. तसेच, इंटरनेट बँकिंग सुविधेत कोणत्याही व्यवहाराचा हक्क असणारा ग्राहक आपले व्हर्च्युअल कार्ड तयार करू शकतो.