PHOTO | लीक झालेल्या न्यूड सीनने त्रासलेली राधिका आपटे, व्हिडीओ व्हायरल होताच घरातून बाहेर पडणे झाले होते कठीण!
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. राधिकाला अभिनयात क्षेत्रात एक उत्कृष्ट अभिनेत्री मानले जाते.
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. राधिकाला अभिनयात क्षेत्रात एक उत्कृष्ट अभिनेत्री मानले जाते. परंतु, काही काळापूर्वी सोशल मीडियावर तिची एक व्हिडिओ क्लिप लीक झाली होती, ज्यामध्ये ती न्यूड दिसत होती. हा व्हिडिओ 2016मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मॅडली’मधील ‘क्लीन शेवन' या मल्टी स्टोरी चित्रपटातील एक दृश्य होते. आता राधिका आपटेने तिच्या या व्हिडीओ क्लिपच्या व्हायरल झाल्यानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.
2 / 5
एका मासिकाशी बोलताना राधिका म्हणाली की, या घटनेने तिला खूप प्रभावित केले होते. ती म्हणाली, 'जेव्हा मी क्लीन शेवनचे शूटिंग करत होते, तेव्हा माझी एक न्यूड क्लिप लीक झाली होती. मला वाईट प्रकारे ट्रोल केले गेले आणि त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. मी 4 दिवस घराबाहेर पडू शकले नव्हते. फक्त मीडिया माझ्याबद्दल काय म्हणत आहे, त्या कारणामुळेच नाही, तर ड्रायव्हर, वॉचमन आणि स्टायलिस्टच्या ड्रायव्हरने देखील त्या व्हिडीओ क्लिप व व्हायरल झालेल्या फोटोंवरून मला ओळखण्यास सुरुवात केली होती.'
3 / 5
राधिका पुढे म्हणाली, 'ते वादग्रस्त फोटो न्यूड सेल्फीज होते आणि कोणताही शहाणा माणूस हा अंदाज लावू शकतो की, ती मी नव्हते. मला असे वाटत नाही की, अशा परिस्थितीत कोणताही माणूस त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय काही करू शकला असता. कारण अशावेळी काहीही करणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे. म्हणून जेव्हा मी 'पार्च्ड' चित्रपटासाठी कपडे उतरवले, तेव्हा मला वाटले की आता लपवण्यासारखे काहीच राहिले नाहीय.'
4 / 5
यावेळी राधिकाने 'पार्च्ड'च्या न्यूड सीनबद्दल देखील सांगितले. ती म्हणते, 'हा सीन करणे माझ्यासाठी सोपे नव्हते, कारण त्यावेळी मी स्वत:च्या ‘बॉडी इमेज’शी झगडत होते. म्हणून स्क्रीनवर पुन्हा न्यूड होणे जरा भीतीदायक होते. मात्र, आता मी अशी दृश्ये न घाबरता देऊ शकते. ' राधिका पुढे म्हणाली की, तिला आपल्या शरीराचा, आकाराचा आणि स्वतःचा अभिमान आहे. ती म्हणते की, हा चित्रपट बर्याच ठिकाणी नावाजला गेला, ज्यामुळे माझे कौतुक झाले व मला काम मिळाले. राधिका म्हणाली, 'मला अशा भूमिकेची मला खूप गरज होती. कारण जेव्हा आपण बॉलिवूडमध्ये असतो, आपल्याला आपल्या शरीरात काय बदल करावे लागतील, हे सतत सांगितले जाते. मी नेहमीच मेंटेन असते, म्हणून मला माझ्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर काहीही करण्याची गरज भासत नाही.'
5 / 5
नुकताच राधिकाचा 'ओके कंप्यूटर' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता, त्यात विजय वर्मा तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय ती ‘भूल’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘पार्च्ड’, ‘अंधाधुंद’, ‘पॅडमॅन’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये दिसली आहे.