Marathi News Photo gallery Rahul Gandhi Birthday Rahul Gandhi turned 54 years old, gave a new life to the party, gave himself a unique gift, know these 10 things special
Rahul Gandhi Birthday : वो तो है अलबेला, हजारो में अकेला; राहुल गांधी यांनी दिली पक्षाला नवसंजीवनी, स्वतःलाच दिले अनोखे गिफ्ट
Rahul Gandhi Birthday : राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी रसातळाकडे जाणाऱ्या काँग्रेसला सावरलेच नाही तर पुन्हा एकदा महत्वपूर्ण भूमिकेत आणून सोडले आहे. जाणून घ्या त्यांच्या या गोष्टी खास...
1 / 8
राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी दिल्लीत झाला. राहुल गांधी हे प्रियंगा गांधी यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे आहे. प्रियंका 52 वर्षांच्या तर राहुल हे 54 वर्षांचे आहेत.
2 / 8
राहुल गांधी यांनी अजून लग्न केलेले नाही. यापूर्वी काही महिलांनी त्यांच्या लग्नाचा विषय छेडला असता, सोनिया गांधी यांनी सून शोधण्यास सांगितले होते. तर लालू यादव यांनी पण राहुल यांना चिमटा काढला होता.
3 / 8
राहुल गांधी यांचे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठ आणि दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयात झाले आहे. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ते फ्लोरिडा येथे गेले. 1994 मध्ये त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी मिळवली.
4 / 8
त्यांच्या राजकीय प्रवासाला 2003 मध्ये सुरुवात झाली. 2017 मध्ये सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडले. त्यावेळी त्यांनी जबाबदारी संभाळली. त्यानंतर काँग्रेस अनेक राज्यात कमकुवत झाली. लोकसभेत पण काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यावेळी त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
5 / 8
2023 मध्ये मोदी नावावरुन त्यांनी केलेली टिप्पणी अंगलट आली. त्यांनी माफी मागितली नाही. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी गेली. पण त्यांनी हिंमत सोडली नाही.
6 / 8
गेल्यावर्षी नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलनी है, या त्यांच्या वाक्याने भारत जोडो यात्रेची दक्षिणेतून सुरुवात झाली. या यात्रेला भारतात जोरदार प्रतिसाद मिळाला. दोन दशकांत पहिल्यांदा एखाद्या नेत्याने अशी यात्रा पूर्ण केली होती.
7 / 8
प्रचंड थंडी असताना पण पांढरा टीशर्ट आणि जीन्स पँटमधील हा आश्वासक चेहरा जनतेला भावला. अनेक ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. या पदयात्रेनंतर त्यांच्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला.
8 / 8
त्यानंतर न्याय यात्रेच्या माध्यमातून त्यांनी पूर्व-पश्चिम भारत पिंजून काढला. लोकसभेपूर्वी इंडिया आघाडीची खिल्ली उडविण्यात आली. पण याच इंडिया आघाडीने भाजपला अनेक मतदारसंघात धुळ चारली. भाजपला 300 जागांच्या आत रोखले.