राज्यात ईडीच्या कारवाईयांनी राजकीय वातावरण तापवलच होतं. मात्र आता थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीच ईडी चौकशी सुरू झाल्याने आता काँग्रेस पुन्हा रस्त्यावर उतरली आहे.
देशात सध्या ब्रिटिशांपेक्षाही जास्त जुलमी सरकार आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येतोय.
तर ही काँग्रेस आहे, याच काँग्रेसने देशातून ब्रिटशांना हकलून लावलं. ही काँग्रेस असल्या कारवाईंना घाबरणार नाही, असा इशाराही काँग्रेस नेते देत आहे.
आज मुंबईत राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. त्यांनी यावेळी भाजप सरकारवर सडकडून टीका आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे आणखीही काही बडे नेते दिसून आले. बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नसीम खान, असे असे अनेक नेते आंदोलनात उतरले होते.
या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्राविरोधात आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.