Rahul Gandhi Viral Photo : राहुल गांधी यांच्यासोबत दिसलेली ‘ती’ कोण ? एअरपोर्टवरील फोटो व्हायरल
'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ज्या व्यक्तीने राहुल गांधी यांच्यासह त्या महिलेचा फोटो शेअर केला आहे, त्यांना सुप्रिया श्रीनेत यांनी कडक शब्दांत उत्तर दिलंय.
1 / 8
देशातील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते तेथे पोहोचल्यावर त्यांच्या स्वागताचे, तसेच अनेक कार्यक्रमातील फोटो समोर आले आहेत. मात्र याच दरम्यान राहुल गांधी यांचा असा एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एक महिलेसोबत दिसत आहेत. तो फोटो नेमका का व्हायरल झाला, ती महिला नेमकी कोण आहे ? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. ( photo : Social media)
2 / 8
उत्तर प्रदेशातील रायबरेलीचे खासदार, आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी अमेरिकेतील टेक्सास येथे पोहोचले. भारतीय प्रवासी आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेस ( IOC) च्या सदस्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
3 / 8
राहुल गांधी यांच्या याच दौऱ्यादरम्यान एक फोटो समोर आला, ज्यामध्ये त्यांच्यासोबत एक महिला उभी असलेली दिसत आहे.
4 / 8
हिरव्या रंगाचा टीशर्ट घातलेले राहुल गांधी, यांच्या बाजूला एअरपोर्टवर दिसलेल्या त्या महिलेने ब्राऊन रंगाचा टॉप परिधान केला होता.
5 / 8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो आल्यानंतर काही वेळातच तो व्हायरल होऊ लागला. ती महिला कोण आहे, असा सवाल अनेक युजर्स विचारू लागले.
6 / 8
'ब्लिट्ज'चे संपादक सलाहुद्दीन शोएब चौधरी (@salah_shoaib) यांनी 'X' वर राहुल गांधींशी संबंधित फोटो शेअर केले.
7 / 8
मात्र, सलाउद्दीन शोएब चौधरी यांच्या दाव्यानंतर त्या फोटोतील महिला कोण आहे, याबद्दल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
8 / 8
फोटोत राहुल गांधी हे त्यांच्या मित्रासोबत, अमिताभ दुबेसोबत दिसत आहेत, तर तेथे दिसणारी महिला ही अमिताभ यांची पत्नी अमूल्या आहे, असे सुप्रिया यांनी पोस्टमध्ये नमूद केलं. त्यांनी चौधरी यांना खडेबोलही सुनावले.