इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची आदिती तटकरेंनी रुग्णालयात घेतली भेट; अंबादास दानवे यांच्याकडून स्थानिकांचं सांत्वन

| Updated on: Jul 20, 2023 | 11:47 AM

Raigad Irshalwadi Landslide Incident : घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी; इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट... तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इर्शाळवाडीत दाखल; केलं स्थानिकांचं सांत्वन

1 / 7
रायगडमधल्या खालापूरच्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची घटना घटली आहे. या दुर्घटनेतील जखमींना कळंबोलीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

2 / 7
या जखमींची राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भेट घेतली.

3 / 7
या भेटीवेळी त्यांनी जखमींची विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं...

4 / 7
या दुर्घटनेतील जखमी नागरिकांना रुग्णालयात आणलं जाईल. त्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने सज्ज राहावं, अशा सूचना आदिती यांनी यावेळी दिल्या.

5 / 7
या दुर्घटनेतील जखमी नागरिकांना रुग्णालयात आणलं जाईल. त्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने सज्ज राहावं, अशा सूचना आदिती यांनी यावेळी दिल्या. यावेळी एमजीएम चे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी  नायब तहसीलदार पनवेल लाचके उपस्थित होते.

6 / 7
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट दिली भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांशी दानवे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.

7 / 7
नागरिकांनी घाबरू नये, प्रशासन सर्वोतोपरी मदत करत आहे. शक्य तितक्या लवकर हे मदतकार्य केलं जातंय. आपण धीर सोडू नये, असं दानवे यांनी यावेळी स्थानिकांशी बोलताना म्हटलं आहे.