पाणीच-पाणी मुंबईतील रस्ते तर जलमय झाले आहेतच पण सखल भागात देखील पाणी साचले आहे. कोकणपाठोपाठ मुंबईसह उपनगरात अधिकचा पाऊस झाला आहे. मंगळवारी तर सकाळपासूनच पावसाला सुरवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
मुंबईतील रस्ते जलमय कोकणपाठोपाठ मुंबईत वरुणराजाची कृपादृष्टी राहिलेली आहे. त्यामुळे सखल भागात तर पाणी साचले आहेच पण रस्तेही जलमय झाले आहेत. वाहनधारकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसामध्ये सातत्य आहे. पण सोमवारपासून जोर वाढला आहे.
कोकणात सातत्य कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून या विभागात अधिकचा पाऊस झालेला आहे. चिपळूण येथील नदी-नाले ओसंडून वाहत होते तर जागोजागी पाणी साचले होते. चिपळूणमध्ये खरिपातील पेरण्या उरकल्या आहेत. तर आता पिकवाढीसाठी या पावसाचा फायदा होणार आहे.
शेतशिवारात पाणी चिपळूण जिल्ह्यात पावसामध्ये सातत्य राहिल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवाय शेतशिवारात पाणी साचून राहत आहे. राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात झाला आहे. त्याचा फायदा उत्पादनवाढीसाठी होणार असल्याचे बोलले जात आहे.
खरिपासाठी पोषक पाऊस विदर्भात पावसाने हजेरी लावली होती पण सर्वदूर समप्रमाणात पाऊस झालेला नव्हता. सोमवारी रात्री आणि मंगळवारी झालेल्या पावसाने शेतजमिनीत पाणी साचले होते तर नदी नाले ओसंडून वाहत होते. पावसाने आपले रुप बदलले असून त्याचा फायदा खरिपासाठी होत आहे.
अमरावतीमध्ये नदी नाले ओव्हरफ्लो जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. शिरजगावात तर नालीतले पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. तर मोझरीमध्ये सूर्यगंगा नदीला पूर आला आहे. तर नदी-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. दोन दिवसांतील पावसाने चित्र बदलले आहे.