सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज
राज ठाकरे औरंगाबादेत दाखल होताच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली.
तसेच हॉटेलवर पोहोचताच त्यांना भगवी शाल आणि आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
स्वागतावेळी पगडी परिधान केलेले एक गुरूजी दिसून आले त्यांनीच राज ठाकरेंचं स्वागत केलं.
राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेची देशभर चर्चा आहे. या सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आलीय.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे उपस्थित होते.