बुलडाणा : दरवर्षी 12 जानेवारी रोजी उत्साहाने साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव यावर्षी साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. 424 व्या जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात सिंधखेडराजा येथील राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून झाली आहे.
आज सकाळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि वंशज यांनी माँसाहेब जिजाऊ यांचे पूजन केले.
यावेळी शासकीय पूजाही संपन्न झाली आहे. पूजनवेळी अनेक जिजाऊ भक्त उपस्थित होते. पूजनादरम्यान जय जिजाऊ जय जिजाऊ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
कोरोनामुळे यावर्षीचा जिजाऊ जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होतोय. मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसार यावर्षी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतो आहे. त्यामुळे जिजाऊ भक्तांची यावर्षी येथे गर्दी पहायला मिळणार नाही.
मात्र जिजाऊ जन्मोत्सव असल्याने राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवर विद्युत रोषणाई केलेली आहे. शिवाय घरीच राहून जिजाऊ यांना मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री शिंगणे यांनी केले आहे