Marathi News Photo gallery Raksha Bandhan Give a special gift to your beloved sister Financial provisions can be made for lifetime health insurance, a Saving Account, financial Gift, Sister Brother
Raksha Bandhan : लाडक्या बहिणीला करा आर्थिक सक्षम! या योजनांचे द्या गिफ्ट
Raksha Bandhan : या रक्षा बंधनाला तुमच्या बहिणीला एक अनोखे गिफ्ट देता येईल. तिला आर्थिक सक्षम करण्यासाठी तुम्ही गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करु शकता. तिच्या नावे आरोग्य विमा काढू शकता. त्यामुळे भविष्यात तिला मोठा फायदा होईल. ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.
Follow us on
रक्षा बंधन (Raksha Bandhan )आले की बहिणीला काय गिफ्ट द्यावे असा प्रश्न भाऊरायाला पडतो. बाजारात भेट देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यापेक्षा काही वेगळं गिफ्ट देण्याचा विचार तुम्ही कधी केला आहे. तुमची बहिणी भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम(Financial Gifts for Raksha Bandhan 2023) व्हावी यासाठी तिला खास गिफ्ट देण्याचा विचार तुम्ही केला आहे. अनेक गुंतवणूक योजना तुमच्या मदतीला येऊ शकतात. त्यात केलेली गुंतवणूक तुमच्या लाडक्या बहिणीला आर्थिक मदतीला येईल. तिचे भविष्य सुरक्षित असेल.
जर लाडक्या बहिणीकडे बँकेत बचत खाते नसेल तर तिच्या नावे एक बचत खाते उघडून द्या. काही सरकारी बँका आणि खासगी बँका तर अवघ्या काही मिनिटात खाते उघडून देतात, तेही ऑनलाईन. या खात्यात तुमच्या खात्यातून दरमहा एका ठराविक रक्कम हस्तांतरीत करा. अचानक खर्च आला तर तिला ही रक्कम उपयोगी पडेल.
तिचे अगोदरच बँक खाते असेल तर या खात्यात तिच्या नावे एक मुदत ठेव योजना सुरु करा. तिच्या खात्यात ऑनलाईन रक्कम जमा करा. अथवा एकदमच रक्कम जमा करुन एफडी सुरु करा. तुम्हाला वाटल्यास आरडीने पण सुरुवात करता येईल. व्याजाची रक्कम जोडल्यास ही गुंतवलेल्या रक्कमेत भर पडेल.
हे सुद्धा वाचा
म्युच्युअल फंड हा पण चांगला पर्याय ठरु शकतो. बहिणीचे डिमॅट खाते उघडून, म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करता येईल. तिच्या नावे दरमहा एक एसआयपी सुरु करता येईल. तिचे शिक्षण, लग्न यासाठी या रक्कमेची मदत होईल.
बचत योजनेत गुंतवणूक केली असेल तर बहिणीसाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करु शकता. तिच्या आरोग्यासाठी आतापासूनच केलेली ही गुंतवणूक भविष्यात उपयोगी पडू शकते.
बहिणीला सोन्याचे गिफ्ट देऊ इच्छित असाल तर फिजिकल सोने देऊ शकता. अथवा डिजिटल गोल्ड, गोल्ड ईटीएफ, गोल्ड बाँड अशी भेट देऊ शकता.
सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ या सारख्या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक सुद्धा मोठी फायदा देणारी आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना नव्याने सुरु झालेली आहे. तसेच इतर काही योजना असतील तर आर्थिक भेट म्हणून देता येईल.