अनलॉकनंतर आता जग पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. रकुलप्रीतही आपल्या शुटिंगवर परतली आहे. तिनं शुटिंग दरम्यानचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं गडद पिवळ्या रंगाचं स्वेटर आणि निळ्या रंगाचे कॉटन शॉर्ट्स परिधान केले आहे.
या फोटोसोबत तिनं मजेदार कॅप्शनही दिलं आहे. “शूट के लिए इंतजार करने के दौरान पाउट किया, कॅन्डिड टाईप पोज किया और पोस्ट किया.” असं कॅप्शन तिनं दिलं आहे.
रकुलप्रीतच्या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे.
रकुल लवकरच अभिनेता अर्जून कपूरसोबत रोमँटिक -कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रकुलप्रीतचंही नाव आलं होतं.