Budh Gochar 2023: बुध ग्रह 1 ऑक्टोबरला कन्या राशीत करणार प्रवेश, तीन राशींचं नशीब चमकणार
Astrology 2023 : बुध ग्रह स्वराशी असलेल्या कन्या राशीत 1 ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या ते
1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा देण्यात आाल आहे. बुध ग्रह बुद्धि आणि व्यवसायाचा कारक ग्रह आहे. बुध ग्रहाच्या गोचरामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. चला तर जाणून घेऊयात राशीचक्रावर कसा परिणाम होणार ते..
2 / 6
बुध ग्रह 1 ऑक्टोबरला स्वरास असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे भद्र राजयोग तयार होणार आहे. त्याचबरोबर बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. हा योग 18 ऑक्टोबरपर्यंत राहील.
3 / 6
बुधाचे राशी परिवर्तन
4 / 6
वृषभ : बुध आणि भद्रा राजयोगामुळे या राशीच्या जातकांना लाभ होईल. एक वर्षानंतर बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे.भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक यश मिळेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल आणि कामात यश मिळेल.
5 / 6
मिथुन : बुध आणि भद्रा राजयोगामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेला पैसाही परत मिळू शकेल. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. करिअरसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.
6 / 6
वृश्चिक : बुधाची स्थिती व्यावसायिकांसाठी अनुकूल ठरेल. काम आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेचा दीर्घकाळापासून चाललेला वाद आणि घरगुती तणाव संपुष्टात येईल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता.